Karisma Kapoor । सध्या करिश्मा कपूर तिचा आगामी चित्रपट मर्डर मुबारकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान करिष्माने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत खुलासा केला आहे.
९० च्या दशकातील चित्रपटांबद्दल बोलतांना करिश्मा कपूर म्हणाली,’९० च्या दशकात मी माझ्या मनाला अनुसरून चित्रपट निवडत असे. त्यावेळी आम्ही सगळे फक्त काम करायचो. कोणताही हिशेब ठेवला नाही.ऊर्जा आणि उत्कटतेने आम्ही पुढे जायचो. अरे मी हे गाणे केले तर हा चित्रपट केला तर होईल, असा हिशोब आम्ही कधीच केला नाही. आम्हाला सांगणारे किंवा सल्ला देणारे कोणी नव्हते. कोणतीही पीआर टीम किंवा स्टायलिस्ट नव्हता. आम्ही फक्त सेटवर राहायचो आणि चित्रपटात काम करायचो’ असं तिने सांगितले.
कोणत्या चित्रपटामुळे तिच्या आयुष्यात बदल झाल्याचे जाणवले? यावर करिश्मा म्हणाली,’प्रामाणिकपणे सांगायचे तर मला वाटते की हिरो नंबर 1 ने व्यावसायिक बदल घडवून आणला. हिरो नंबर १ नंतर मी आमिर खानसोबत राजा हिंदुस्तानी, शाहरुख खानसोबत दिल तो पागल है असे चित्रपट केले. म्हणूनच मी व्यक्तिशः हिरो नंबर 1 हा बदल घडवून आणणारा चित्रपट मानते ‘
मर्डर मुबारक या चित्रपटाव्यतिरिक्त करिश्मा कपूर ब्राउन सीरिजमध्येही दिसणार आहे. मालिका क्राईम-ड्रामा आहे. पण त्याहीपेक्षा त्या स्त्रीच्या प्रवास यात दाखविण्यात आला आहे.
हेही वाचा
हॉलिवूड गायक एड शीरनने केला अल्लू अर्जुनच्या गाण्यावर ‘ डान्स’