नवी दिल्ली – करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या जबरदस्त फॅशन सेन्समुळे ती चर्चेत असते. करीनाला हेल्दी लाईफस्टाइल जगायला फार आवडते हे तिच्या सततच्या पोस्टवरून दिसून येते.
बेबोने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेल्फी शेअर केला, ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा नवीन सेल्फी शेअर करताना करिनाने कॅप्शनमध्ये लिहिले – ”लेजी लम्हे” (आळशी क्षण )”.
फोटोमध्ये करीनाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ती पांढऱ्या शर्टमध्ये किती साधी आणि क्यूट दिसत आहे. केसांचा बन घातलेला, तिने तिच्या मनगटावर घड्याळ असलेल्या चंकी गोल्ड कफसह तिचा लूक ऍक्सेसरीझ केला. फोटोत तिचे मादक डोळेही मस्त दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाने तिला आणखीच सुंदर बनवले आहे.
View this post on Instagram
करीना कपूर लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी, अभिनेत्रीने तिच्या सहकलाकार आमिर सोबत एक मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला, जो लोकांना खूप आवडला. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की,‘ये रहा मेरे हीरो के साथ फेदर चैलेंज! आमिर खान.”
‘लाल सिंह चड्ढा’चे चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. कोरोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि चित्रीकरणावर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.