पुणे – मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी अनेक वेळा साडीतले फोट सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या साडीतल्या फोटोला चाहते कौतुकही करताना दिसून येतात. असाच एक साडी नेसलेला फोटो प्राजक्ताने नुकताच शेअर केला आहे. अभिनेत्रीने अलिकडे साडी नेसून फोटोशूट केले व ते फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले. प्राजक्ताने शेअर केलेल्या साडीतील फोटोमुळे नेटकरी मात्र अचंबीत झाले त्याचे कारणही तसेच आहे.
View this post on Instagram
प्राजक्ताने ब्लाऊज परिधान न करताच साडी नेसली व त्याचे फोटोशूट करून ते सोशल मिडियावर शेअर केले. त्यामुळे साडी नेसताना ब्लाऊज परिधान न करणं ही कसली फॅशन असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अभिनेत्रीचे हे फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या फोटोमध्ये तिने आसामी सिल्क साडी परिधान केलेली दिसत आहे. तसेच साडीवर लाल आणि निळ्या रंगाचं वर्क पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने परिधान केलेले दागिने विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत.
अभिनेत्रीच्या फोटोला अनेकांनी कंमेट्स केल्या आहेत. त्यामध्ये एकाने ‘प्राजक्ता ब्लाऊज परिधान करायला विसरलीस का?’ असा प्रश्न अभिनेत्रीला केला आहे. याशिवाय प्राजक्ताचे काही जणांनी कौतुकही केल्याचे बघायला मिळाले आहे.