शिरूर- मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे जागतिक महिला दिनानिमित्त ऍक्टिव्ह सोशल ग्रुप यांचे वतीने स्वसंरक्षणासाठी वसतिगृहातील मुलींसाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले. प्रा. डॉ. ईश्वर पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कराटे चॅम्पियन वर्षा रणसिंग व जयश्री आखुटे यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे तंत्र शिकविले. मुली व स्त्रियांवर होणारे अत्याचार यापासून आपले संरक्षण कसे करावे याविषयी विशेष माहिती देण्यात आली. डॉ. पवार यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास व आजची समाज मानसिकता याविषयी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर पोलीस स्टेशनचे भगवान पालवेर उपस्थित होते. त्यांनी दामिनी पथकाविषयी माहिती दिली. वसतिगृहाच्या अधीक्षक साखरे यांनी प्रास्ताविक के ले. त्यानंतर इसवे, कामिनी बाफना, सुनीता बिहानी, सपना बरमेचा, मनीषा नहार, रुपाली बोरा, सपना बोरा, अपर्णा शाह, नीलम बोथरा यांनी वसतिगृहातील मुलींशी संवाद साधून मार्गदर्शन केले.