मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला इंडस्ट्रीत ‘काटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. शेफालीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले नाही पण तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो. पुन्हा एकदा शेफालीचा सुंदर पारंपारिक लूक व्हायरल होत आहे. हलक्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात शेफाली खूपच क्यूट दिसत आहे.
View this post on Instagram
शेफाली जरीवालाला काटा लगा गाण्यानंतर बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात तिचे काम चांगलेच गाजले. दुसरीकडे, तिच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर शेफाली हलक्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे.
शेफाली जरीवाला तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जात असली मात्र यावेळी तिने इन्स्टाग्रामवर तिचा पारंपरिक लूक शेअर केला आहे. पीच कलरच्या शराला सूटमध्ये शेफाली खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक इंटरनेटवर चाहत्यांना खूप आवडतो आहे.
View this post on Instagram
शेफाली जरीवाला इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर सुंदर आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. शेफाली अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक शेअर करून इंटरनेटवर खळबळ माजवते.