नवी दिल्ली : देशातील करोना संसर्गात पुन्हा वाढ झाली असल्याचे दिसत आहे. कारण मागील 24 तासांत पुन्हा पाच हजारहून जास्त करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या काल चार हजारांच्या खाली पोहोचली होती. देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी मंगळवारी 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
तुलनेने करोना रुग्णांच्या संख्येत 739 रुग्णांची घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 45 हजार 746 करोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.1 टक्के आहे.
देशव्यापी करोना लसीकरणात आतापर्यंत एकूण 215 कोटीहून अधिक करोना लसी देण्यात आल्या आहेत. मागच्या 24 तासांत 19 लाख 25 हजार 881 करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील करोना रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 98.71 टक्के आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 1.44 टक्के आहे. देशभरात मंगळवारी दिवसभरात 3 लाख 55 हजार 231 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.