Mahadev Betting App – महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (ED) कडून सातत्याने कारवाई सुरू आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ, महाराष्ट्राची राजधानी मुंबई , पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता यासह एकूण 39 ठिकाणी छापे टाकले होते.
या छाप्यात सोन्याची नाणी, दागिन्यांसह 417 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पण झडतीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि पुरावे सापडले. छाप्यादरम्यान मिळालेल्या कागदपत्रांमध्ये 14 बॉलिवूड स्टार्सची नावेही आढळली.
आता ईडीचे अधिकारी त्या बॉलीवूड स्टार्सवर लक्ष ठेवले असून ऑनलाइन बेटिंग ॲपद्वारे फसवणूक प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे.
ईडीने श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, रणबीर कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आता नेमहमीच आपल्या स्पष्टवक्ते शैलीमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने एक पोस्ट शेअर केली आहे.
मात्र, अश्यातच आता ईडीने मुंबईतील अनेक बड्या बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापे टाकले असल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे. या पोस्टमध्ये तिने बॉलिवूड स्टार्सवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सध्या कंगनाची (Kangana Ranaut) ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
कंगना म्हणाली की, “महादेव ॲपच्या प्रमोशनसाठी मला वर्षातून 5-6 वेळा ऑफर मिळाल्या करोडो रुपयांची ऑफर देण्यात आली होती पण तिने ती घेण्यास नकार दिला.
प्रत्येक वेळी करोडो रुपये देऊन मला विकत घेण्याचा प्रयत्न झाला. यासाठी मी नेहमीच नकार दिला. हा नवा भारत आहे. स्वतःला सुधारा नाहीतर तुमची सुधारणा होईल…’ असा इशारा कंगनाने दिल्याचं या पोस्टमधून दिसून आलं.