मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत सध्या विविधप्रकारे चर्चेत असते. तिच्या आरोप-प्रत्योरापाच्या बातम्या रोजच असतात. मात्र कंगनाने आपले नवे रूप समोर आणले आहे. यामुळे तिच्याबद्दल अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. तिचे नवे रूप आहे कवयित्रीचे.
कंगनाने स्वतः रचना केलेली नवी कविता ‘आसमान’ तिच्या चाहत्यांसाठी तिने शेअर केली आहे. कंगनाने स्वतःमधील काव्यभावना जागृत करून ट्विटरवर आपली एक कविता शेअर केली आहे. या कवितेला तिच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कंगनाने फोटो शेअर केले असून बॅकग्राउंडला तिचा आवाज आहे. कंगनाच्या आवाजात ही कविता ऐकायला मिळते. या कवितेचे शिर्षक ‘आसमान’ असे आहे.
या व्हिडिओत कंगणाच्या घरासहीत मनालीतील सुंदर दृष्यांचाही समावेश आहे. या कवितेत आकाशाला अनंत, मोठा अशा रूपकात सादर केले आहे. यात एका प्रेमीच्या प्रेमावर शंका उपस्थित केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिते, ‘ही कविता मी उन्हाळात लिहिली असून, आता गुलाबी थंडी सुरू झाल्यानंतर आकाशाची आठवण करून देईल.’