काळे यांचे नऊ दिवसांनंतर आंदोलन मागे

क्रमांक पाचच्या साठवण तळ्याचे काम लवकरच होणार सुरू

कोपरगाव – कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक कोपरगाव नगरपरिषदेने तांत्रिक मंजुरीसाठी 3 जून रोजी संगमनेर येथील कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठविले आहे. तसेच साठवण तलाव क्र. 5 चा आराखडा गायत्री कंपनीला आज दिला आहे, असे लेखी पत्र तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आज धरणे आंदोलनस्थळी येऊन आशुतोष काळे यांना दिले. त्यामुळे काळे यांनी धरणे आंदोलन मागे घतले.

सोमवारी (दि.3) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व गायत्री कंपनीचे उपाध्यक्ष रेड्डी यांच्यात बैठक होऊन नवीन साठवण तलाव क्र.5चे काम करण्यास कंपनीने तयारी दर्शविली. त्यामुळे पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडण्याचे आंदोलन स्थगित करून धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे काळे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे धरणे आंदोलनच्या नवव्या दिवशी (दि.4) धरणे आंदोलन सुरूच होते.

आज तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आंदोलन स्थळी येऊन चर्चा करून लेखी पत्र काळे यांना दिले. त्यावेळी कोपरगावच्या व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी आशुतोष काळे यांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला. प्रशासनाने दिलेले आश्‍वासन तातडीने पूर्ण करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे हे काम पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील.

दिरंगाई झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही आशुतोष काळे यांनी यावेळी दिला. पद्माकांत कुदळे, नगरसेवक संदीप वर्पे, सुनील गंगुले, विजयराव आढाव, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाघचौरे, हिरामण गंगुले, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, धरम बागरेचा, नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, संतोष चवंडके, रमेश गवळी, संदीप सावतडकर, दिनार कुदळे, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, मेहबूब शेख, निखील डांगे, दिनकर खरे, मुकुंद भुतडा, नीलेश उदावंत, रावसाहेब साठे, आदर्श पठारे, नारायण गाडे, बाळासाहेब रुईकर, बापू वढणे, बाला गंगुले, वाल्मीक लाहिरे, निखील डांगे, स्वप्नील पवार, सतीश शिंदे, अनिस शेख, धनजय कहार, विजय नागरे, संदीप कपिले, विक्की जोशी, महेश उदावंत, नितीन साबळे, रोहित साळुंके, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के, चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर, सचिन परदेशी, अरुण चंद्रे, राजेंद्र फुलपगर, नारायण गोरडे,गणेश बुरुडे आदी मान्यवरांसह कोपरगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.