वाशीम – सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्व पूर्ण आहे.
हिंदू श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करणाऱ्या भक्तांना आनंदी, शांती आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो.
याच श्रावण महिन्याचे औचित्य साधत वाशिम येथील पुरातन भगवान पद्मेश्वर मंदिरात तब्बल 5 क्विंटलचा संपूर्ण पितळेचा साज पद्मेश्वर अर्पण करण्यात आला आहे.
हा संपूर्ण साज एका भांड्याच्या व्यावसायिकाने अर्पण केला आहे. या शृंगारामुळे महादेवाला आगळं वेगळं रुप आलं आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा प्रकारचा शृंगार महादेवाला कधीही करण्यात आलेला नाही. सध्या मंदिरातील महादेवाचे हे सुवर्ण रूप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
करोना संसर्गामुळे सध्या सर्व धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंद आहेत. लवकरच करोनाचे हे संकट जाऊन मंदिर उघडी व्हावी अशी प्रार्थना नागरिक करत आहे.