पुणे – भारत माता की जय.. वंदे मातरम्च्या जयघोषात, दृष्टीहीन मुलांनी केलेल्या पूजनानंतर जम्मू-काश्मीरमधील सैनिकांसाठी पुण्यातील जी.पी.ओ कार्यालयातून राख्यांचे “स्पीड पोस्ट’ रवाना झाले. याप्रसंगी जम्मू-काश्मीर विभागात 15 वर्षे सेवारत असलेले कर्नल विक्रम पत्की म्हणाले, “आजचा दिवस महत्त्वाचा आहे. चॉकलेट राख्यासह दिव्यांगांनी तयार केलेल्या राख्यांचे विशेष महत्त्व आहे. या राख्या पाहून आपला परीवार आणि भारत देश आपल्या पाठीशी आहे,असे सैनिकांना वाटेल.’
यावेळी संस्थेचे हेमंत जाधव, प्रणव पवार, सुभाष सूर्वे, विक्रम मूर्ती उपस्थित होते. पुणे जी.पी.ओ.चे सिनियर पोस्टमास्तर बाळकृष्ण एरंडे म्हणाले, “या स्पीड पोस्ट पार्सलवर एक “माय स्टॅम्प’ लावून ही “स्पीड-पोस्ट पाठविण्यात आली आहे. हे पार्सल वेळेत जम्मू काश्मीर येथे पोहोचतील याची आम्ही काळजी घेऊ. त्यासाठी वारंवार या पोस्टची ट्रॅकींग करून खात्री करू.’