येरवडा – अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन येरवडा भागात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांनी मानवंदना दिली.
सिद्धार्थ मित्र मंडळ : सामाजिक कार्यकर्त्या अनिता आगरवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश सोनावणे, निखील वंजारे, जमील सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अष्टविनायक मित्रमंडळ, माजी सैनिकनगर : लता वानखेडे, स्त्रीशक्ती महिला नागरी पतसंस्थेच्या संस्थापक क्रांती शितोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जयश्री घाडगे, अलका काटकर, स्नेहा शिंदे, शांतीदेवी बिस्ट, राधिका कदम यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक ऍड. भगवान जाधव, नामदेवराव घाडगे, सज्जन परदेशी, गौरव देशमाने, साहिल जाधव सुरेखा जाधव, राजश्री परदेशी, हर्षदा जाधव, दर्शन वानखेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी केले होते.
एकता फाउंडेशन: वतीने विविध क्षेत्रांतील नागरिकांचा करोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेविका ऐश्वर्या जाधव, माजी नगरसेवक सतीश म्हस्के, आशुतोष जाधव, राजेश बेंगळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंगेश परदेशी यांनी केले होते.
शिवसेना : पक्षातर्फे घरेलू कामगार महिलांना कोविशील्ड लस प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले होते. यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, शहर समन्वयक सुनील जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शैलेश ऊर्फ पाला मोरे यांनी केले
होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कलामंदिर : येथे स्मिता काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष रावसाहेब खंडागळे, सुनील थोरात, संजय वाल्हेकर, लक्ष्मण सरोदे आदी उपस्थित होते.
अजिंक्य युवा प्रतिष्ठान व श्री सिद्धीविनायक मित्र मंडळ : लक्ष्मीनगर येथे चित्रकार दीपक चांदणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. लिंबा कावरे, नागनाथ मांढरे, आप्पा जगताप, राजेश चांदणे, योगेश कांबळे, अनिकेत चांदणे, नितीन चव्हाण, आदित्य तांबेकर, शोभा मांढरे, सपना चव्हाण, मनिषा तांबेकर, शीतल चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले होते.