बेल्हे (वार्ताहर) :- पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जगभरात फैलावत असणा-या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराइडची फवारणी गावात दुस-यांदा करण्यात आल्याचे गावचे उपसरपंच रामदास तट्टू यांनी दिली.या आधीही गावातील सर्व महत्वाच्या ठिकाणी तसेच वस्तीवर औषध फवारणी केली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1187011178305252/
ग्रामस्थांन कडून सर्व शासकीय नियमांचं पालन करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभाग,वनविभाग,कृषीविभाग, पोलीस,पोलिस पाटील यांच्याकडून होत असलेल्या सहकार्य बद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने समाधान व्यक्त केले.पुन्हा वाढलेल्या लाॅकडाऊनच्या काळात गोरगरीब जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून गावचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण यांनी पंच्याहत्तर कुटुंबांना किराणाचे वाटप केले.