सीसीटीव्ही कॅमेराद्वारे ठेवणार नजर
बारामती : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिलवाडा पॅटर्नची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. बारामती शहरातील सर्व चौकात सीसीटीव्ही बसविण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण चौकात फिरणाऱ्यांना चाप बसणार आहे.
बारामती शहर सीलबंद करण्यात आले आहे तरी, काही नागरिक विनाकारण शहरात फिरताना दिसत आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे अशा महाभागांना चाप लावण्यासाठी शहरातील सर्व चौकात सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत.
पोलीस सीसीटीव्ही द्वारे विनाकारण फिरणाऱ्यावर पोलीस नजर ठेवणार असून, सीसीटीव्हीवर बारामती पोलिसांचे नियंत्रण असणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लॉक डाउनच कालावधी ३ मेपर्यंत घेतला असून कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.