पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या सौदीच्या राजपुत्रानेच घडवली;अमेरिकच्या अहवालातून माहिती उघड

वॉशिंग्टन: वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणाचा गुप्तचर यंत्रणेचा एक अहवाल अमेरिकेने डिक्लासिफाइड केला असून त्यात सांगितलंय की इस्तंबुलमध्ये खाशोगींची हत्या करण्यात आली होती ती मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरुनच करण्यात आली होती.अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या गोपयस्फोटने एकच खळबळ उडाली आहे.

जो बायडेन प्रशासनाने इंटेलिजेन्स रिपोर्ट डिक्लासिफाइड करुन सर्वात मोठे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. जो बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे मध्य-पूर्व आशियामध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे. हा अहवाल ट्रम्प यांच्या कार्यकालात आला होता. पण ट्रम्प यांचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संबंध लक्षात घेता तो जाहीर केला नव्हता. या अहवालामुळे आता अमेरिका आणि सौदी अरब या दोन देशांदरम्यानच्या संबंधात आता तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकन नागरिक असलेल्या पत्रकार जमाल खागोशी यांच्या हत्येनंतर ती हत्या राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी केल्याचे सांगण्यात येत होते. पण ट्रम्प यांच्याकडून या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप होत आहे.

वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात जमाल खाशोगी हे सौदी अरबवर एक कॉलम लिहायचे. आपल्या लेखनातून त्यांनी सौदी अरबच्या राज्यकर्ते आणि राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर टिका करायचे. खाशोगी हे जेव्हा इस्तंबुलमधील सौदी अरबच्या कॉन्सुलेटमध्ये गेले असताना त्यांना एक नशीला पदार्थ देऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना 2018 साली घडली होती. खाशोगी यांच्या हत्येचा थेट संशय सौदी अरबचा राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर व्यक्त करण्यात येत होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.