जेएनयूचे नाव बदलून एमएनयू करावे – खासदार हंस राज हंस

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार हंस राज हंस त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिल्लीतील प्रख्यात जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचे नाव बदलण्याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. जेएनयूचे नाव बदलून एमएनयू करावे…मोदींच्या नावावर देखील काहीतरी असावे असे विधान हंस राज हंस यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

एका वृत्तसंस्थेने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हंस राज हंस जेएनयूबाबत बोलताना दिसत आहेत. शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अभाविपने आयोजित केलेल्या एक शाम शहीदों के नाम या कार्यक्रमात हंस राज हंस सहभागी झाले होते. यावेळी जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत मत व्यक्त करताना केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले आणि काश्‍मीरचा आता झपाट्याने विकास होईल असेही त्यांनी यावेळी म्हटले. आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आम्ही भोगतोय असेही ते म्हणाले. मी जे बोलतोय ते ऐकायला विचित्र वाटेल पण मी म्हणतो जेएनयूचे नाव बदलून एमएनयू करावे… मोदींच्या नावावर देखील काहीतरी हवे ना, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.