न्यूझीलंडमधील निवडणुकीत पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न विजयी

ऑकलंड (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमधील निवडणुकीमध्ये पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या लेबर पार्टीने 49 टक्‍के मते मिळवून निर्विवाद विजय मिळवला आहे, असे मतमोजणीचे अंतिम कल पुढे आल्यावर स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पक्षाचा प्रतिस्पर्धी असलेल्या नॅशनल पार्टीला केवळ 27 टक्‍के मते मिळवण्यात यश मिळाले. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना या विजयामुळे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळणार हे निश्‍चित झाले आहे.

संसदेतील बहुसंख्य जागांवर लेबर पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. न्यूझीलंडमध्ये प्रमाणबद्ध मतदान प्रक्रियेची गेल्या 24 वर्षांपासून अंमलबजावणी केली जाते आहे. तेव्हापासून एका पक्षाला इतके मोठे बहुमत मिळाले नव्हते. सर्वसाधारणपणे न्यूझीलंडमधील राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी स्थापन करावी लागत असे. मात्र यावेळी अर्डर्न आणि त्यांच्या लेबर पार्टीला यावेळी तशी आघाडी करावी लागणार नाही. ऑकलंडमधील विजयी सभेला संबोधित करताना जेसिंडा अर्डर्न यांनी हा विजय न्यूझीलंडमधील ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.