मार्च अखेर भारतात लस शक्‍य

पुणे – अनेक उत्पादक लस संशोधनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारताला करोनावर मार्चपर्यंत लस उपलब्ध होऊ शकते, असे मत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केले.

लस उत्पदकांना नियामकांनी परवानगी दिल्यानंतर भारत जलदगतीने लस बनवू शकेल. दोन उत्पादक तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहेत. तर एक उत्पादक दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे. आणखी काही जण या प्रक्रियेत लवकरच सहभागी होत आहेत. या लसीसाठी जागतिक स्तरावर सुरू असणाऱ्या स्पर्धेबाबत सारेच आशावादी आहेत, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.