गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद

नगर -नगर-सोलापुर रस्त्यावरील वाटेफळ गावच्या शिवारास गावठी कट्टा बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला असून, त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे कट्ट्यासह हस्तगत करण्यात आले आहे.

आरोपी प्रवीण पांडुरंग बोराडे (वय-21, रा. सावरगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद. हल्ली मु. गुणवाडी ता. नगर), याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार ज्ञानेश फडतरे, संदीप पवार, सचिन आडबल, संतोष लोढे, रवींद्र कर्डीले, दीपक शिंदे, रणजीत जाधव, राहुल सोळंके, कमलेश पाथरुट यांच्या पथकाने वाटेफळ शिवारातील हॉटेल विश्वशांती जवळ सापळा रचवून पकडले.

त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व 400 रूपये किमतीचे दोन जिवंत काडतूस, एक मोबाईल असा एकूण 33 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.