पुणे – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर “नीट’ अर्थात नॅशनल एन्ट्रन्स एलिजिबिलिटी टेस्ट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली. आधी या परीक्षा मे मध्ये नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलैमध्ये पार पडणार होती. आता या परीक्षा सप्टेंबरमध्येच होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणे शक्य नाही, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हटले आहे. “नीट’ परीक्षा दुसऱ्या आठवड्यात होण्याचा अंदाज आहे. मात्र, अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असे “एनटीए’ने स्पष्ट केले आहे.
“एनटीए’ने परीक्षा केंद्र आणि इतर सुविधांबाबत विद्यार्थ्यांना आधीच सूचना दिल्या आहेत. ऍडमिट कार्ड मिळणे सुरू झाल्यानंतर “एनटीए’च्या वेबसाइटवरून ते डाऊनलोड करता येणार आहे.
दरम्यान, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही परीक्षा स्थगित करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने नुकतीच फेटाळली आहे. आता जेईई मेन्स परीक्षा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि आणि “नीट’ तिसऱ्या आठवड्यात होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.