मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी पोलीस, ईडी सुप्रीम कोर्ट सर्वत्र तपास, याचिका, खटले सुरू आहेत. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या प्रकरणाचा तपास आता CBI कडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून, कुणीच त्याला विसरू शकलेलं नाही.
नुकतंच सुशांतची भाची कात्यायनी आर्या राजपूतने हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. कात्यायनीला आपल्या गुलशन मामाची म्हणजेच, सुशांतची आठवण येत आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर त्याच्यासह एक फोटो शेअर करत,आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जी वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यातही अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
कात्यायनी म्हणाली, ‘गुलशन मामा… मी तुझ्यावर ब्रह्मांडापेक्षाही भरपूर प्रेम करते. तू माझ्यासाठी आधीपासून अनमोल होत आणि आजही आहे. तुझ्या प्रत्येक बोलण्याने मला मंत्रमुग्ध केलं आणि मला नेहमी तू प्रेरित केलं. तुझा आवाज कधीच ऐकू शकणार नाही, असा दिवस येईल असं कधी कल्पनेतही वाटलं नव्हतं. तू एकदा म्हणाला होतास प्रत्यक्षात आपण कधीच मरत नाहीत. यावर मला खरंच विश्वास ठेवायचा आहे मात्र प्रत्येक दिवसाला हे खूप कठीण होतं आहे’.