चित्रपट निर्माते रमेश तलवार यांनी जावेद खान अमरोही यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्यांनी पीटीआयला सांगितले की, जावेद दीर्घकाळापासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. फुफ्फुस निकामी झाल्यामुळे त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, जावेद खानसोबत काम केलेल्या काही बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे. सोशल मीडियावरही चाहते अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
Will miss our Anand Akela 👌🏻🎈
Javed Khan Amrohi #andazapnaapna pic.twitter.com/lgd0A7a5eH
— Vishal (@shutupvishal) February 14, 2023
बॉलीवूड अभिनेत्री पूनम ढिल्लननेही जावेद खानवर शोक व्यक्त करत त्यांचे स्मरण केले. जावेद खानने पूनम ढिल्लनसोबत ‘नूरी’ चित्रपटात काम केले होते. पूनमने धिल्लॉनला सांगितले की, “ते माझे नूरीमध्ये सहकलाकार होते… ते एक सज्जन माणूस होते, त्याच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. यासोबतच गदर अभिनेत्री अमिषा पटेल हिनेही या अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सुपर अॅक्टर लिहून आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आहे.’
Gutted to hear about #JavedKhanAmrohi Bhai’s demise. This seems to be a season of farewell. 💔💐
Condolences to his family, friends, colleagues @iptamumbai 🙏🏽#Nukkadd #Lagaan, and so on and so forth. pic.twitter.com/FpV17XMRO8
— Danish Husain । دانش حُسین । दानिश हुसैन (@DanHusain) February 14, 2023
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही ट्विट करून अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शबानाने लिहिले की, जावेद यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते इप्टाच्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक होते. कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.”
So tragic to learn of Javed Khan Amrohi’s demise. . He was one of our finest actors of IPTA . Heartfelt condolences to family and friends pic.twitter.com/tRIWXK3Co8
— Azmi Shabana (@AzmiShabana) February 14, 2023
जावेद अमरोही यांनी ‘चक दे इंडिया!’ ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘लगान’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. नुक्कड, मिर्झा गालिब यासारख्या अनेक हिट शोमध्ये त्यांनी काम केले.