न्यूयॉर्क : जपानमध्ये काल मोठी घटना घडली आहे. जपानचे एअर सेल्फ डिफेन्स फोर्सचे युद्ध विमान एफ-१५ हे बेपत्ता झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी उड्डाण केल्यानंतर हे फायटर जेट रडावरवरुन गायब झाले. या विमानाने मध्य जपानमधील कोमत्सु एअरबेसवरुन उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी म्हणजेच पाच किमी अंतर कापल्यावर हे विमान जपानच्या समुद्रावर असताना रडारवरुन गायब झाले.
माध्यमांमधील माहितीनुसार, या विमानामध्ये दोन क्रू मेंबर्स होते. हे जेट ट्रेनिंगसाठी वापरलं जात होतं. या विमानाचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
प्राथमिक पहाणीमध्ये ज्या ठिकाणाहून या विमानाचा संपर्क तुटला तेथे समुद्रात काही गोष्टी तरंगताना आढळून आल्यात. सध्या तज्ज्ञांचा एक गट या विमानाचा शोध घेत आहे. तपासामध्ये काय माहिती समोर येते यावरुनच हा विमानाचं नक्की काय झालं हे सांगता येणार आहे.
जपानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे फायटर जेट त्या स्क्वाड्रनचा भाग होतं जे प्रशिक्षणादरम्यान शत्रूचं विमान म्हणून सहभागी व्हायचं. सध्या या विमानाचा शोध घेण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.