नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्प आज सकाळी ११ वाजता मांडण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी औरंगाबादचे असलेले केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. भागवत कराड यांच्यामुळे महाराष्ट्राला काय मिळेल? याची उत्सुकता आहे.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय असेल? याची सर्वांना उत्सुकता आहे. ही उत्सुकता आणि अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. अर्थसंकल्पापूर्वी भागवत कराड यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी पूजा करून संसदेत दाखल झाले.
Delhi: MoS Finance Bhagwat Karad offers prayers at his residence ahead of the presenting of #UnionBudget2022 in the Parliament today. pic.twitter.com/hkCWTNCe7f
— ANI (@ANI) February 1, 2022
अर्थसंकल्पावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी शांततेत बसून अर्थसंकल्प ऐकावा आणि सहकार्य करवे. पंतप्रधान मोदींनाही हेच अपेक्षित आहे, असं भागवत कराड अर्थसंकल्पापूर्वी म्हणाले.
कोण आहेत भागवत कराड
-भागवत कराड हे भाजपचे राज्यसभेतील खासदार
– व्यवसायाने डॉक्टर औरंगाबादमधील नूतन कॉलनीत त्यांचे हॉस्पिटल
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात कराड यांचे शिक्षण
– गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भागवत कराड यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी