नवी दिल्ली – वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आज देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यार होणार असून अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
National Oil Marketing companies have reduced commercial 19-kg LPG cylinder cost by Rs 91.50 effective from today, 1st February. 19 kg commercial cylinder will cost Rs 1907 in Delhi from today: Sources
— ANI (@ANI) February 1, 2022
एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत दिलासा देण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅसच्या दरात कपात केली आहे. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) ने फेब्रुवारी महिन्यासाठी घरगुती गॅसच्या किमती (LPG गॅस सिलेंडरची आजची किंमत) जाहीर केली आहेत. त्यानुसार, विनाअनुदानित सिलिंडरच्या (एलपीजी गॅस सिलिंडर) किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
राजधानी दिल्लीत घरगुती गॅसची किंमती कोणत्याही बदलाशिवाय म्हणजेच 899.5 रुपये आहे. त्याचबरोबर तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किमती कमी केल्या आहेत. इंडियन ऑइलने (IOC) 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91.5 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर नवी दिल्लीत 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1 हजार 907 रुपये झाली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर
दिल्लीत विना सबसिडीवाल्या 14.2 किलोच्या इंडेन गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये गॅस सिलेंडरची किंमत 926 रुपये आहे. मुंबईत, घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत सध्या 915.50 रुपये आहे.