टोकियो – भारताच्या बी. साईप्रणीत याचे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. अग्रमानांकित केन्तो मोमोता याने त्याचा 21-18, 21-12 असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला.
मोमोताने सिंगापूर खुल्या स्पर्धेत साईप्रणीतवर मात केली होती. त्यामुळे येथील लढतीतही त्याचे पारडे जड मानले गेले होते. तरीही साईप्रणीतने त्याला पाऊण तासाच्या या सामन्यात उल्लेखनीय झुंज दिली.