Australian Open Women’s Final 2024 : ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी (27 जानेवारी) मेलबर्नमध्ये खेळला गेला. बेलारूसच्या आर्यना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिने चीनच्या क्विनवेन झेंगचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तिने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. सबालेन्का हिनं हा सामना 6-3, 6-2 असा जिंकला.
14 sets played, 14 sets won, the reigning champion retains her 👑!
Queen Aryna’s second coronation caps a perfect fortnight at Melbourne Park.@SabalenkaA • @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis pic.twitter.com/x7639RQr84
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2024
सबालेन्का हिला स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले होते. दरम्यान, झेंगला (Zheng Qinwen) 12वे मानांकन मिळाले. गेल्या वर्षी आर्यना सबालेन्का हिने हे विजेतेपद पटकावले होते. सबालेन्काने झेंगचा पराभव करत कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
2013 नंतर महिला एकेरीत हे घडले..
25 वर्षीय सबालेन्का 2013 नंतर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेतेपद पटकवाणारी पहिली महिला खेळाडू ठरली. यापूर्वी बेलारूसच्याच व्हिक्टोरिया अझारेंकाने 2012 आणि 2013 मध्ये सलग दोन विजेतेपद पटकावले होते. दुसरीकडे झेंग ही 2014 नंतर अंतिम फेरीत पोहोचणारी चीनची पहिली महिला खेळाडू होती. 2014 मध्ये ‘ली ना’ हिने विजेतेपद पटकावले होते.
झेंगवर दिसून आले अंतिम फेरीचे दडपण….
सबालेन्काने सामन्यात शानदार सुरुवात केली. तिने पहिला सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये झेंगने सुरुवातीला काही काळ नक्कीच चांगला खेळ केला, पण तिला साबालेन्कापुढे जास्त वेळ टक्कर देता आली नाही. पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम फायनलमध्ये खेळण्याचे दडपण झेंगवर स्पष्टपणे दिसत होते. तिने दुसरा सेट 6-2 अशा फरकाने गमावला. अशाप्रकारे सबालेन्काने तिला सरळ सेटमध्ये पराभूत केले.