Bollywood News – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अनेक वर्षांपासून शिखर पहारियासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ‘कॉफी विथ करण’मधील हावभावातून अभिनेत्रीने तिच्या नात्याची अप्रत्यक्षपणे होकर दिला आहे. अशात आता यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर एका पार्टीनंतर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत कारमधून निघताना दिसली होती. दोघांना एकत्र पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. चर्चा अशीही आहे की जान्हवी कपूरने साराला सोशल मीडियावर अनफ्रेंड केले आहे. दोघींनी एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी, जान्हवी साराला फॉलो करायची आणि तिचे फोटोही लाइक करायची. पण आता जान्हवीने सारापासून दुरावल्याचे दिसून येत आहे.
नुकतीच जान्हवी कपूर तिची धाकटी बहीण खुशी कपूरसोबत कॉफी विथ करणमध्ये दिसली होती. यावेळी जेव्हा करण जोहरने प्रश्न विचारला तेव्हा तिने सांगितले की, जेव्हा ती दुसऱ्याला डेट करत होती तेव्हा शिखर तिच्यासाठी ‘नादान परिंदे घर आजा’ गाायचा. यावेळी तिने शिखरचे खूप कौतुकही केले.