Entertainment: अभिनेता आमिर खानची लेक इरा आणि जावई नुपूर यांचे काही दिवसांपूर्वीच हटके पद्धतीने कोर्ट मॅरेज झाला. त्यानंतर आयरा आणि नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केलं आहे. बुधवारी उदयपूरमध्ये दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. सध्या इरा आणि नुपूरच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये अमीर खान लेकीच्या लग्नात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
इरा -नुपूर एकमेकांना अंगठी घालतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात आमिरचे डोळे पाणावले होते. या व्हिडिओत आमिर खान त्याचे डोळे पुसताना दिसत आहे. आयराच्या लग्नातील आमिरचा भावूक व्हिडिओ पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. या व्हायरल व्हिडिओत आयरा आणि नुपूर यांचं लग्न लागताच दोघे एकमेकांना किस करताना दिसतात. त्यानंतर इरा -नुपुर एकमेकांना अंगठी घालतात आणि उपस्थित लोक टाळ्या वाजवतात. त्यावेळी आमिर भावूक झालेला दिसला. त्याला अश्रू अनावर झालेले दिसले.
View this post on Instagram
दरम्यान, आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपूर शिखरेच्या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले होते. आमिर खानचा जावई घोडीवर नव्हे तर फक्त बनियान आणि चड्डी (शॉर्ट्स) घालून लग्नाच्या मिरवणुकीत पोहोचला होता. कदाचित तुम्हीही पहिल्यांदाच अशा स्टाईलमध्ये वराला आपल्याच लग्नात येताना पाहिले असेल. कोर्ट मॅरेजनंतर त्यांनी १० जानेवारीला पुन्हा ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. यानंतर इरा आणि नुपूरचं मुंबईत ग्रँड रिसेप्शनही होणार असल्याची माहिती आहे.