Janata Dal Secular Joins BJP-Led NDA Alliance – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून सध्या मित्र पक्षांची जुळवाजुळव सुरु आहे. अशातच भाजपला आता आपला एक जुना मित्र पक्ष पुन्हा मिळाला आहे. एच डी देवेगौडा यांच्या जनता दलाशी (सेक्युलर) युती झाल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप व जेडी(एस) स्वबळावर लढले होते. राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला काँग्रेसने पराभवाची धूळ चारत सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या होत्या. कर्नाटकात झालेल्या पराभवाची जखम ओली असतानाच जुना मित्र पुन्हा मिळणं भाजपसाठी ही चांगली बातमी म्हणावी लागेल.
कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा असून त्यापैकी २५ जागांवर सध्या एकट्या भाजपचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये लागलेला निकाल भाजपच्या विरोधात गेला असल्याने लोकसभा निवडणुकांमध्येही याचा फटका बसू नये यासाठी भाजप राज्यात सक्रिय झाल्याचं बोललं जातंय.
Met Former Chief Minister of Karnataka and JD(S) leader Shri H.D. Kumaraswamy in the presence of our senior leader and Home Minister Shri @AmitShah Ji.
I am happy that JD(S) has decided to be the part of National Democratic Alliance. We wholeheartedly welcome them in the NDA.… pic.twitter.com/eRDUdCwLJc— Jagat Prakash Nadda (@JPNadda) September 22, 2023
2019च्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसने अत्यंत खराब कामगिरी केली होती. त्यांना केवळ एक जागा जिंकता आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसला 19 जागा जिंकता आल्या. २०१८ मध्ये जेडीएसने विधानसभेच्या ३७ जागा जिंकल्या होत्या.
वोक्कलिंगा मतदारांवर भाजपचा डोळा? । Janata Dal Secular Joins BJP-Led NDA Alliance
जेडी(एस)चा प्रभाव वोक्कलिंगा मतदारांवर अधिक असल्याचे जाणकार सांगतात. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जुन्या मित्राला सोबत घेत विधानसभेत सत्ता गमवाव्या लागलेल्या भाजपसमोर कर्नाटकातील लोकसभेच्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे, असं बोललं जातंय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हा मतदार काही प्रमाणात काँग्रेसकडे वाळल्याचं पाहायला मिळालं असून ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटाच मानावी लागेल.
येडियुरप्पांनी आधीच केलेली न्यूज ब्रेक । Janata Dal Secular Joins BJP-Led NDA Alliance
जेडीएस-भाजप युतीचे वृत्त भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आधीच ब्रेक केले होते. लहान पक्ष मंड्या आणि इतर तीन जागांवरून निवडणूक लढवेल असं सांगत त्यांनी जेडी(एस) सोबतच्या युतीचा सूतोवाच केला होता. असं असलं तरी आज दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा झाली असून जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अग्रलेख : भाजप-अण्णाद्रमुकमधील तेढ