Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये एक भीषण अपघात घडला आहे जिथे किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खाली खोल दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण 40 लोक प्रवास करत होते. दरम्यान, आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.
#WATCH | At least five people died in a bus accident in Assar region of Doda in J&K. Injured shifted to District Hospital Kishtwar and GMC Doda. Details awaited. pic.twitter.com/vp9utfgCBR
— ANI (@ANI) November 15, 2023
डोडा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार,”मृतांची संख्या २५ किंवा त्याहून अधिक असू शकते. किश्तवाडहून जम्मूकडे जाणारी बस डोडा जिल्ह्यातील अस्सार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून घसरली आणि दुसऱ्या रस्त्यावर 250 मीटर खाली पडली, असे पोलिस नियंत्रण कक्ष डोडामधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
#WATCH | At least five people died in a bus accident in Assar region of Doda in J&K. Injured shifted to District Hospital Kishtwar and GMC Doda. Details awaited. pic.twitter.com/E3WWXyhv5f
— ANI (@ANI) November 15, 2023
या अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विटरवर,’असर भागात बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आत्ताच हरविंदर सिंग, डीसी, डोडा, जम्मू आणि काश्मीर यांच्याशी बोललो. दुर्दैवाने २५ जणांचा मृत्यू झाला. जखमींना आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालयात किश्तवार आणि जीएमसी डोडा येथे हलवण्यात येत आहे. अधिक जखमींना हलविण्यासाठी हेलिकॉप्टर सेवेची व्यवस्था करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार शक्य ती सर्व मदत केली जात आहे. मी सतत संपर्कात आहे.” असे म्हटले आहे.