लातूर : राज्यात लॉकडाऊन असताना देखील निलंगा शहरात १२ परप्रांतीय जामाबाग मज्जीदमध्ये राहत होते. त्यांना आरोग्य विभागाच्या पथकाने लातूरच्या शासकीय रुगालयात दाखल केल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
देशभरात बंद असताना देखील तेलंगणा राज्यातील १२ जण निलंगा शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी त्यांची वैद्यकीय चाचणी केली. ते सर्व जण हरियाणा राज्यातील फिरोजपूर आणि हिसार येथील कार्यक्रम पार पाडून टेम्पोने आपल्या गावी निघाले होते.
गुरुवारी रात्री ते निलंगा शहरातील जामबाग मज्जीदमध्ये मुक्कामास थांबले होते. त्यांची सर्वांची तपासणी केली असता त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाही मात्र पुढील तपासणीसाठी त्यांना लातूरमधील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.
या घटनेनंतर पालिकेने मज्जीद परिसरात औषध फवारणी केली ;असल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले. या १२ जणांच्या नमुन्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.