corona : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात 70 नव्या करोना रुग्णांची निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या सक्रिया रुग्णांची संख्या ही 743 इतकी झाली. तसेच सर्वाधिक सक्रीय रुग्ण हे एकट्या ठाणे जिल्ह्यात आहेत.
त्यापाठोपाठ मुंबई जिल्ह्यात 130 सक्रीय रुग्ण असून पुण्यात 124 सक्रीय रुग्ण सध्या उपचार घेत आहे. नव्या आलेल्या जेएन.१ या व्हेरियंटचे 15 रुग्ण एकट्या पुण्यात आढळून आले आहेत.
सोमवार 1 जानेवारी रोजी 32 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तसेच राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 98.17 टक्क्यांवर पोहचला. मागील अनेक दिवसांपासून कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तसेच नव्या आलेल्या जेएन.1 या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा धास्ती वाढवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.