मुंबई – अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिने अतिशय कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ‘चिट्टीयां कल्लाईयां वे…’ या गाण्यामुळे जॅकलिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
View this post on Instagram
जॅकलिनने सोशलवर आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. जॅकलिन सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
View this post on Instagram
जॅकलिनने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, तिचा हा फोटोशूट बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याने केले आहे. या फोटोत जॅकलिनचा हॉट आणि बोल्ड अंदाज दिसत आहे.
View this post on Instagram
जॅकलिनने निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये फोटोशूट केलंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने निळे हार्ट पोस्ट केलेत. तिच्या या फोटोला 12 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या फोटोतील तिचा अंदाज फॅन्सला अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे
View this post on Instagram
जॅकलिनचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. सध्या तिच्या फोटो शूटमुळे ती सोशलवर प्रचंड गाजली आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी ‘रामसेतू’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘किक २’ अटॅक सारख्या सिनेमात दिसणार आहे.