Sunil Narine Historic Record : सुनील नरेन आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी चेंडूपेक्षा बॅटने अधिक प्रभावी ठरत आहे. मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नरेन तिसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात नरेनने 39 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी खेळली आणि त्यानंतर गोलंदाजीत 1 बळीही घेतला.
लखनौविरुद्धच्या या शानदार कामगिरीनंतर नरेनने तो ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला, जो ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजासारख्या महान अष्टपैलू खेळाडूंनाही करता आला नाही. नरेनने या मोसमात 452 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजी करताना 14 विकेट घेतल्या आहेत, त्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत तो तिसरा आणि पर्पल कॅपच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
यासह एकाच संघाकडून खेळताना 1500 हून अधिक धावा करणारा आणि 150 हून अधिक बळी घेणारा नरेन आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. नरेनने 2012 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. केकेआरमध्ये सामील झालेला नरिन आत्तापर्यंत इतर कोणत्याही फ्रेंचायझीसाठी खेळलेला नाही.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी
या यादीत एकापेक्षा जास्त फ्रँचायझींसाठी खेळलेला रवींद्र जडेजा पहिल्या तर ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ब्राव्होने 1004 धावा केल्या आणि 140 विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने चेन्नईकडून खेळताना 1639 धावा केल्या आहेत आणि 133 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.
IPL मध्ये 1500+ धावा आणि 150+ विकेट्स घेणारे खेळाडू…
रवींद्र जडेजा – 2894 धावा आणि 160 विकेट्स (एकाहून अधिक संघांसाठी खेळताना)
ड्वेन ब्राव्हो – 1560 धावा आणि 184 विकेट्स (एकाहून अधिक संघांसाठी खेळताना)
सुनील नरेन- 1507 धावा आणि 170 विकेट्स (फक्त केकेआरकडून खेळताना).