मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘पठाण’ चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. ‘पठाण’ हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे.
या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. हा चित्रपट खास करण्यासाठी शाहरुख आणि चित्रपटाचे निर्माते खूप मोठी योजना आखली आहे. दरम्यान, आज या चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टिझर मध्ये अभिनेता जॉन अब्राहमसह अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसून येत आहे. तर दुसरीकडे शाहरुखची देखील दमदार एन्ट्री दिसून येते.
View this post on Instagram
दीपिकासाठी हा पहिलाच ऍक्शन पॅक्ड रोल असणार आहे. या रोलसाठी दीपिकाने कठोर मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे शूटिंग भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या प्रसिध्द ठिकाणी करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर ‘पठाण’ चित्रपटाचा टिझर चांगलाच व्हायरल झाला असून, फॅन्स देखील टीझरला पसंती देत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.