नवी दिल्ली – दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केली असली तरी आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी 15-20 वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाबाबत भविष्यवाणी केली आहे. आप ला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी आणखी पंधरा वीस वर्षाचा कालावधी लागेल. एका रात्रीत कोणताही चमत्कार होत नसतो, असे त्यांचे मत आहे.
केजरीवाल यांच्या पक्षाने दिल्लीनंतर पंजाब मध्ये सरकार स्थापन केली आहे. याशिवाय सुरत आणि चंदीगडमध्ये महानगर पालिकेत झेंडा फडकवीला आहे. आता आपची सत्ता दोन राज्यामध्ये आहे. यामुळे केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आम आदमी पक्ष आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे.
आम आदमी पक्षाचा ग्राफ चढता असला तरी प्रशांत किशोर यांना केजरीवाल यांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होणार नाही असे वाटते. त्यांच्यामते एका रात्रीत कोणताही चमत्कार होत नसतो. आम आदमी पक्ष एवढ्या लवकर राष्ट्रीय पक्ष होऊ शकणार नाही, असे त्यांचे मत आहे. यासाठी 15-20 वर्षाचा कालावधी लगेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय नेते आहेत, परंतु याचा अर्थ ते पराभूत होऊ शकत नाही, असे अजिबात नाही, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी पक्षाला 20 कोटी मते मिळवावी लागतात. 2019 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला फक्त 27 लाख मते मिळाली होती. अशात कोणत्याही प्रकारचा अंदाज बांधणे घाईचे होईल,. असे किशोर म्हणाले.
सध्या कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षासह सहा पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. परंतु, कॉंग्रेस आणि भाजप या दोन पक्षानेच देशभर आपले जाळे निर्माण केले आहे. अन्य पक्षाने प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. तरीसुद्धा, दुसऱ्या पक्षाला यात यश येणार नाही असेही नाही,. असे किशोर यांचे म्हणणे आहे.