पुणे – जयपूर (राजस्थान) येथे येत्या गुरुवारपासून सुरु होत असलेल्या 45 व्या वरीष्ठ गट राष्ट्रीय टेनिक्वाईट (रिंग टेनिस) स्पर्धेसाठी राज्याच्या पुरुष संघाचे पुरुष व महिला संघाचे नेतृत्व अनुक्रमे शुभम पांडे व रेणुका व्यवहारे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
नंदुरबार येथे झालेल्या राज्य स्पर्धेमधून महाराष्ट्र टेनिक्वाईट संघाची निवड करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र टेनिक्वाईट महासंघाचे सरचिटणिस अनिल वरपे यांनी दिली.
पुरुष संघ – शुभम पांडे कर्णधार (भंडारा),तेजस गाडगीळ (सांगली), प्रथमेश ढवळे (पुणे), रोहित बोरगावे (पुणे),निहाल खोब्रागडे (नागपूर), मनिष स्नेहल(नंदुरबार), प्रशिक्षक – अनिल वरपे, व्यवस्थापक – बाळासाहेब जगताप.
महिला संघ – रेणुका व्यवहारे (भंडारा), मनस्वी अंदुरकर (पुणे), हर्षदा निगडे(पुणे), अदिती सारले(भंडारा), प्राजक्ता बागूल (नंदुरबार), मृदुला ठाकरे (नागपूर ग्रामीण), प्रशिक्षक – कृष्णा ठाकरे, व्यवस्थापक – यशवंत वेदपाठक.