पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी पुण्यात येत आहेत. त्यांच्या हस्ते हनुमान मंदिरात महाआरती होणार आहे. परंतु, तो पक्षाचा कार्यक्रम आहे का, ते माहिती नाही, त्यामुळे महाआरतीच्या कार्यक्रमात जाण्याबाबत आपण अद्याप काही ठरवलेले नाही, असे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या सभेत मशिदींबाबत भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते नाराज झाल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मोरे आणि राज ठाकरे यांची मुंबईत भेट झाली.
मी मनसेतच असेही मोरे यांनी स्पष्ट केले. परंतु, पुण्यात ठाकरे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात महाआरतीचा कार्यक्रम होत असताना आपण अजून ठरवलेलं नाही, तो पक्षाचा कार्यक्रम आहे का ते माहिती नाही, मी उद्या सकाळी त्यांची भेट घेणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.