Israel : इस्रायलने लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेला ‘दहशतवादी संघटना’ या यादीत टाकले आहे. नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाने एक निवेदन जारी केले आहे. यात मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त इस्रायलने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केले आहे, असे म्हटले आहे.
इस्रायली दूतावासाने निवेदनात,“भारत सरकारने तसे करण्याची विनंती केली नसतानाही इस्रायलने सर्व आवश्यक प्रक्रिया औपचारिकपणे पूर्ण केल्या आहेत. “इस्रायलच्या बेकायदेशीर दहशतवादी संघटनांच्या यादीत लष्कर-ए-तैयबा समाविष्ट होण्यापूर्वी सर्व आवश्यक तपासण्या आणि नियम पूर्ण झाले आहेत.”असे म्हटले आहे.
तसेच पुढे इस्रायली दूतावासाने सांगितले की, लष्कर-ए-तैयबा ही एक घातक आणि निषेधार्ह दहशतवादी संघटना आहे, जी शेकडो भारतीय नागरिकांच्या तसेच इतरांच्या हत्येला जबाबदार आहे. 26 नोव्हेंबर 2008 च्या घटना सर्व शांतता शोधणार्या देशांत आणि समाजांत गुंजतात. इस्रायल दहशतवादात बळी पडलेल्या सर्वांप्रती आणि मुंबई हल्ल्यातील वाचलेल्या आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रती प्रामाणिक शोक व्यक्त करतो. चांगल्या शांततामय भविष्याच्या आशेने आम्ही तुमच्यासोबत एकजुटीने उभे आहोत.” असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला.
इस्रायलचे हे पाऊल अशा वेळी आले आहे जेव्हा भारताने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलियासह अन्य देशांनी हमासवर बंदी घातली आहे.