israel-iran war – इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणकडून ३०० ड्रोन डागण्यात आले आहेत. अमेरिकेनेही इराणला इशारा दिला आहे. जर इराणने हल्ला केला तर इस्त्रायलच्या समर्थनार्थ अमेरिकाही युध्दात उतरेल असे त्यांनी इराणला बजावले आहे. । israel-iran war | America Support
दरम्यान, आता इराणने इस्रायलवर डागलेली सुमारे ८० ड्रोन आणि किमान ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अमेरिकेने पाडली असल्याचा दावा पेंटॅगॉनने केला आहे. यामध्ये लॉंच व्हेइकल आणि येमेनमधील हौथींचे नियंत्रण असलेल्या भूभागातून ७ ड्रोन डागली जाण्यापूर्वीच नष्ट करण्यात आली होती, असे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
इराणने काल इस्रायलवर ३०० ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. इस्रायलने १ एप्रिलला सीरियातील इराणी दूतावासाला ड्रोनद्वारे उडवून दिल्याची प्रतिक्रीया म्हणून हा हल्ला केल्याचे इराणने म्हटले होते. इराणने डागलेली बहुतेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतच पाडली होती. । israel-iran war | America Support