Innova HyCross petrol GX (O) – टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज इनोव्हा हायक्रॉस GX (O) पेट्रोल प्रकारात नवीन कार सादर केली आहे. इनोव्हा हायक्रॉसमध्ये 10 हून अधिक अॅडव्हान्स कम्फर्ट आणि टेक्नाॅलॉजी फीचर्स उपलब्ध असल्याचा कंपनीचा दावा आहे. या नवीन माॅडेलसाठी बुकिंग आधीच सुरु झाले आहे. तर आजपासून वितरण (15 एप्रिल, 2024) सुरू होत आहे.
इनोव्हा हायक्रॉस ही सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे. यामध्ये तुम्हाला चांगली जागा तर मिळतेच पण त्यामध्ये खूप चांगला आरामही मिळतो. यामुळेच लांबचा प्रवास करणारे लोक टोयोटाची इनोव्हा हाय क्रॉस खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल GX (O) पेट्रोल व्हेरियंटची वैशिष्ट्ये –
नवीन व्हेरियंटमध्ये फ्रंट एलईडी फॉग लॅम्प्स, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आहेत, याशिवाय रियर डीफॉगर आहे. या कारमध्ये चेस्टनट थीमचे इंटीरियर उपलब्ध आहे. सॉफ्ट टच मटेरियल डोर्स पैनल, डॅशबोर्डंवर मिळतो.
मिड ग्रेड फॅब्रिक सीट्स आणि रिअर सनशेड यांसारखे फीचर देण्यात आली आहेत. याशिवाय यात ऑटो एसी, 10.1 इंच इंफोटेनमेंट सिस्टीम, वायर लेस ऍपल कार प्ले आणि पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर सारखी फीचर्स आहेत. या कारमध्ये 7-8 सीटरचा पर्याय उपलब्ध आहे.
किंमत –
Hycross Petrol GX (O) – 8-Seater: 20.99 लाख रुपये
Hycross Petrol GX (O) – 7-Seater: 21.13 लाख रुपये