Israel Hamas War – इस्रायलला जर हमासचा पूर्ण नायनाट करायचा असेल, तर हे युद्ध तब्बल १० वर्षे चालेल, अशी शक्यता फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ (emmanuel macron) यांनी व्यक्त केली आहे. इस्रायलकडून पुन्हा युद्ध सुरू केल्यामुळे गाझामधील जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली.
कोप-२८ परिषदेदरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना मॅक्रॉ यांनी युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठीचे प्रयत्न दुपटीने वाढवण्याच्या गरजेवरही भर दिला.
हमास आणि इस्रायल दरम्यानचा हंगामी युद्धविराम शुक्रवारी समाप्त झाला. या युद्धविरामाच्या अटींचा इस्रायलनेच भंग केल्याचा आरोप हमासकडून करण्यात येतो आहे. या युद्धाचा शंवट नक्की केंव्हा होईल, याची स्पष्ट कल्पना इस्रायलने देणे आवश्यक आहे.
जर पॅलेस्टिनींच्या जीवाच्या बदल्यात इस्रायलला आपली सुरक्षितता हवी असेल, तर ती सुरक्षा दीर्घकाळ टिकू शकणार नाही आणि अशा प्रकारे प्रदेशातील सार्वजनिक नाराजी मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे इस्रायलने आपले उद्दिष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे.असे मॅक्रॉन पुढे म्हणाले
इस्रायलने या युद्धाचे आपले अंतिम उद्दिष्ट स्पष्ट करावे. जर हमासचा पूर्ण नायनाट इस्रायलला करायचा असेल, तर हे युद्ध आणखीन १० वर्षे चालू शकते.
– इमॅन्युएल मॅक्रॉ, फ्रान्सचे अध्यक्ष