बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. ईशाचे नुकतेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. यानंतर ईशाने सोशल मीडिया यूजर्सला सावधान करत कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ते निट पाहावे, असा सल्ला दिला होता.
दरम्यान, ईशाचे इंस्टाग्राम अकाउंट काही काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आले. ईशाने रविवारी सायंकाळी इंस्टाग्राम अकाउंटवर एक नोट पोस्ट करत सांगितले की, माझे हॅक झालेले अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तसेच ईशाने लोकांना हॅकर्सच्या जाळ्यात न अडकण्याची सूचना केली आहे.
ईशाने लिहिले की, मित्रांनो, मला फक्त हेच सांगायचे आहे की माझे इंस्टाग्राम अकाउंट पुनर्संचयित झाले आहे. तत्परतेने काम करून आवश्यक पावले उचलणाल्याबद्दल मी इंस्टाग्रामच्या टीमचे आभार मानते.
कृपया आपले अकाउंट कोणात्याही प्रकारे हॅक होउ नये यासाठी सावधगिरी बाळगा. विशेषत: कोणत्याही लिंक तपासल्याशिवाय त्यावर क्लिक करू नका. याबद्दल मी दिलगीर आहे. माझ्याबरोबर राहिल्याबद्दल सर्व फॉलोअर्सचे आभार.