बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने नवीन वर्षाची सुरुवात जोमाने करत कामाला प्रारंभ केला आहे. सध्या तिचे वेळापत्रकात खूपच व्यस्त आहे आणि सन 2020 हेदेखील कामाच्या बाबतीत तिच्यासाठी खूप चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. गतवर्षी सान्याचे “लुडो’ आणि “शकुंतला देवी’ हे दोन चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले होते.
View this post on Instagram
सान्या म्हणाली, “व्यावसायिकदृष्ट्या, 2020 हे वर्ष माझ्यासाठी खूप समाधानकारक राहिले आहे आणि त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान मानत आहे. गतवर्षीचा तो अनिश्चित काळ माझ्यासाठी किमान कामकाजासाठी चांगला राहिला. मला आनंद आहे की माझे “लुडो’ आणि “शकुंतला देवी’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.’ ती पुढे म्हणाली, “सन 2020मध्ये मी दोन मोठ्या प्रॉडक्शन हाऊस (धर्मा आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट) मध्येही काम केले आहे.
View this post on Instagram
यावर्षी माझ्याकडे तीन चित्रपट आहेत. ही संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी माझ्या आगामी चित्रपटांकडून खूप अपेक्षा करत आहे. मी नुकतीच नवीन वर्षाची तयारी आणि शूटिंग सुरू करत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सान्या मल्होत्राने “मीनाक्षी सुंदरेश्वर’, “लव हॉस्टल’ आणि “पगलेट’ हे तीन चित्रपट साइन केले आहे. या चित्रपटाच्या तयारीत ती सध्या व्यस्त आहे.