सिडनी – भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सिडनी कसोटीत सहा हजार धावांचा पल्ला गाठला आहे. सहा हजार धावा पूर्ण कराना पुजारा भारताला 11 वा फलंदाज ठरला आहे.
तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी नाथन लॉयनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजाराने 6 हजार धावा पूर्ण केल्या. सिडनी कसोटी सामन्यात पुजाराने निर्णायक क्षणी 77 धावांची खेळी केली. पुजाराने आपल्या कारकिर्दीतील हा 80 वा सामना खेळला आहे.
पुजाराने 134 व्या डावांत 48 च्या सरासरीने सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. पुजाराने 18 शतके व 27 अर्धशतके फटकावली आहेत. 206 ही पुजाराची सर्वोच्च धावसंख्या आहे. 10 वर्षांपूर्वी बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियारुद्धच पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्हिव्हिएस. लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सौरव गांगुली, दिलीप वेंगसकर, महंमद अजहरुद्दीन व गुंडप्पा विश्वनाथ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यांच्या पंक्तित आता पुजाराचाही समावेश झाला आहे.