Shiv Thackeray : मराठमोळा अभिनेता आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. सध्या शिवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो भयानक अवतारात दिसत होता. त्याचा हा अवतार पाहून त्याला ओळखणे देखील कठीण झाले आहे.
शिव ठाकरेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत तो चाहत्यांसोबत प्रँक करताना दिसतो. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘मस्तीच अंगाशी आली’ असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच काय तर तो मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसतो. शिवने या व्हिडीओमध्ये प्रोस्थेटिक मेकअप केलेला होता. हा प्रोस्थेटिक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
यावेळी शिवच्या चेहऱ्यावर मोठ मोठे फोड, टक्कल आणि विचित्र अवतार पाहायला मिळत आहे. प्रँक करताना जेव्हा तो लोकांसमोर जातो तेव्हा अनेक जण त्याला घाबरतात. शिव ठाकरे ह्या विद्रूप अवतारामध्ये कोणीही ओळखत नाही. परंतु व्हिडिओत शेवटी एका रिक्षा ड्रायव्हरच्या कृत्याने चाहत्यांचे मन जिंकले. रिक्षावाल्या काकांनी त्याला दया दाखवत पैसे दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने ‘शेवटी मराठी माणूसच मराठी माणसाच्या मदतीला आला’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सोशल मीडियावर शिवचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.