भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना डब्लिन येथे होणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून मालिकेत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ युवा खेळाडूंनी भरलेला असून कर्णधार बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांसारखे काही खेळाडूही पुनरागमन करत आहेत. अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंचा संस्मरणीय कामगिरी करून आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर दुसरीकडे अननुभवी भारतीय संघाला हरवण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल.
दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे :-
भारत :- ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई.
आयर्लंड :- पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (wk), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.