Ira-Nupur Wedding Reception : अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आणि जावई नुपूर शिखरे यांचे मुंबईत 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज झाले होते. त्यानंतर आयरा आणि नुपूरने उदयपूरमध्ये कुटुंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थित मोठ्या उत्साहात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर आयरा आणि नुपूरचं मुंबईत 13 जानेवारीला वेडिंग रिसेप्शन पार पडले.
या सोहळ्यात सिनेजगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. इतकंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्याला हजर राहिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन पार्टीला हजर राहून दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आमिर खानने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं, त्या निमंत्रणाचा मान ठेवत एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यांचा कार्यक्रमातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
इतकंच नाहीतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या देखील या सोहळ्याला उपस्थित होत्या. त्यांनी पिवळ्या रंगाचा सुंदरचा ड्रेस परिधान केला होता. त्यांच्या एकूणच स्टायलिश लूकने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या रिसेप्शन पार्टीत उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, सलमान खान, शाहरुख खान, रेखा, हेमा मालिनी यासारख्या अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते.
View this post on Instagram