मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला येत्या 26 मार्चपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचा सलामीचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) व गतउपविजेता कोलकाता नाईट रायडर (केकेआर) यांच्यात रंगणार आहे.
हा सलामीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार असून यंदा या स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत. गेल्या मोसमात चेन्नईने कोलकाताचा अंतिम सामन्यात 27 धावांनी पराभव करत विजेतेपद साकार केले होते.
यंदाच्या स्पर्धेत दोन नवे संघ दाखल झाल्यामुळे एकूण 70 सामने खेळवले जाणार असून या फेरीच्या 55 लढती मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर तर 15 लढती पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होणार आहेत.